ट्रम्प म्हणाले किम हे हार्ड निगोशिएटर !

सिंगापुर – आज पहिल्यांदाच अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी उत्तर कोरियाच्या प्रमुखांशी थेट भेट घेतली. किम जोंग यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल स्वता ट्रम्प यांनाही बरीच उत्त्सुकता दिसली. त्याविषयी पत्रकारांनी ट्रम्प यांना बोलते करण्याचा प्रयत्न केला तेव्हा ट्रम्प म्हणाले की किम हे बरेच स्मार्ट आहेत. ते हार्ड निगोशिएटर आहेत. ते अतिशय हुशारही आहेत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांचे त्यांच्या देशावर खूप प्रेमही आहे.

दोन्ही नेत्यांच्या अधिकृत चर्चेनंतर त्यांच्यामध्ये एकत्रित भोजनही झाले. त्यानंतर या दोन्ही नेत्यांनी ज्या हॉटेल मध्ये ही चर्चा झाली त्या हॉटेलच्या हिरवळीवर एकत्रितपणे फेरीही मारली. आमची ही भेट अपेक्षेपेक्षाहीं चांगली झाली असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. सिंगापुरच्या सेंटोसा भागातील कॅपेल्ला हॉटेल मध्ये ही भेट झाली. हे दोन्ही नेते बैठकीच्या सुरूवातीला थोडे नर्व्हस दिसले पण जगभरातील पत्रकारांसाठी पोझ देताना मात्र त्यांच्यात थोडा सैलपणा आला. औपचारीक चर्चेची फेरी करण्यापुर्वी दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी सुमारे चाळीस मिनीटे, चर्चा केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)