ट्रम्प म्हणतात टीकाकार पराभूत आणि द्वेषी

वॉशिंग्टन – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज उत्तर कोरियाचा प्रमुख किम जोंग यांच्याशी जी चर्चा केली त्यावरून ट्रम्प यांच्यावर अनेकांनी टीकाही केली आहे. पण स्वता ट्रम्प यांनी या टीकाकारांचा समाचार घेतला आहे. या भेटीवरून टीका करणारे पराभूत आणि द्वेषी आहेत असे त्यांनी म्हटले आहे.

किम यांची भेट घेण्यापुर्वीच ट्रम्प यांनी ट्‌विटरवरून टीकाकारांना प्रत्युत्तर देताना म्हटले आहे की, मी किम जोंग यांची भेट घेणे हे अमेरिकेचे सर्वाधिक नुकसान आहे असे टीकाकारांचे म्हणणे आहे पण त्यांनी केलेली ही टीका पुर्ण पराभूत आणि द्वेषाच्या मानसिकतेतून केलेली आहे. हे टीकाकार पहिल्या पासूनच अशा मानसिकतेतून या बैठकीला विरोध करीत आहेत. पण आम्ही योग्य मार्गावरच आहोत असा दावा त्यांनी केला आहे.

या चर्चेच्या दोन दिवस आधीच ट्रम्प आणि किम सिंगापुरला त्यांच्या अधिकाऱ्यांसह दाखल झाले आहेत. या दोन देशांमध्ये अधिकाऱ्यांच्या पातळीवरही चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत. ही चर्चाही चांगल्या स्वरूपात झाल्याची माहिती ट्रम्प यांनी या ट्‌विटर मध्ये दिली आहे. निशस्त्रीकरणाबाबत उत्तर कोरिया समाधानकारक प्रतिसाद देत नाही असे मला दिसून आले तर मी या चर्चेतून सरळ बाहेर निघून येईन असे ट्रम्प यांनी या आधीच स्पष्ट केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)