ट्रम्प, मॅक्रॉन, आणि थेरेसा मे हे गुन्हेगार…

इराणचे सर्वोच्च नेते अयातोल्ला खामेनींनी केली जळजळीत टीका
र्तेहरान – अमेरिका आणि तिच्या मित्र राष्ट्रांनी सीरियावर जो क्षेपणास्त्र हल्ला केला त्याचे तीव्र पडसाद आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटत असून इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, फ्रांसचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांची ही कृती गुन्हेगारी स्वरूपाची असल्याचे म्हटले आहे. त्यांनी सीरियावर आज सकाळी केलेला हल्ला हा भीषण स्वरूपाचा होता ती एक गुन्हेगारी कृती आहे असे त्यांनी म्हटले आहे.

स्वत: सीरिया सरकारनेही या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला असून आमच्यावर झालेला हा हल्ला घृणास्पद स्वरूपाचा असल्याचे म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करून त्यांनी ही कृती केली असल्याचे सीरियाच्या विदेश मंत्रालयाने म्हटले आहे. आम्ही देशात कुठेही रासायनिक अस्त्रांचा वापर केलेला नाही. आमच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय पहाणी पथक आमच्या देशात येणार होते पण त्यांच्या या प्रक्रियेत अडथळा आणण्यासाठीच अमेरिका आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांनी ही कृती केली आहे असे त्यांनी म्हटले आहे. या तीन देशांनी आमच्यावर केलेले हे अतिक्रमण अपयशी ठरेल असा दावाही त्यांनी केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)