ट्रम्प भेटीबाबत पाकिस्तानी मंत्र्यांचा खोटेपणा उघड

वॉशिंग्टन (अमेरिका) – पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांच्याशी अनौपचारिक चर्चा झाल्याचे सांगितले होते. मात्र व्हाईट हाऊसने कुरेशी यांचा खोटेपणा उघडा पाडला आहे. डोनॉल्डस्‌ ट्रम्प यांनी कुरेशी यांच्याशी केवळ हस्तांदोलन केले होते. कोणत्याही प्रकारची चर्चा त्यांच्यात झाली नाही, असे व्हाईट हाऊसने स्पष्ट केले आहे.

मंगळवारी राष्ट्रसंघाच्या महासचिवांनी राष्ट्रपतींच्या सन्मानार्थ एका भोजन कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात ट्रम्प यांना भेटण्याची आणि त्यांच्याशी अमेरिका-पाकिस्तान संबंधाबाबत अनौपचारिक चर्चा करण्याची संधी आपल्याला मिळाली. ट्रम्प यांनी पाकिस्तानबरोबर पूर्वीप्रमाणेच द्विपक्षीय संबंध जोडण्याचा इरादा जाहीर केला असे कुरेशी यांनी पाकिस्तानच्या सरकारी टेलिव्हिजनला दिलेल्या मुलाखतीत दावा केला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावर ट्रम्प यांनी कुरेशींशी केवळ हस्तांदोलन केल्याचा खुलासा व्हाईट हाऊसने करून कुरेशी यांचे पितळ उघडे पाडले आहे. त्या कार्यक्रमाचे वार्तांकन करणाऱ्या कोणाही पत्रकाराने त्यांच्या भेटीचा उल्लेखही केला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)