ट्रम्प-पुतीन भेटीपूर्वी अमेरिकन व रशियन पदाधिकारी भेटणार

माॅस्को: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन या दोन बड्या नेत्यांची लवकरच भेट होणार असून पुढील तयारीसाठी अमेरिकन व रशियन राजनैतिक पदाधिकारी लवकरच भेटणार असल्याचे वृत्त रशियन वृत्त संस्थांनी दिले.

रशियाचे परराष्ट्र मंत्री सरगे लावरोव्ह हे अमेरिकेचे राज्य सचिव माईक पॉमपीओ यांंनी येत्या दोन आठवड्यात भेटणार असल्याचे रशियाचे उप-परराष्ट्र मंत्री सरगेई ऱ्याबकोव्ह यांनी सांगितले.
तत्पूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याअगोदरच पत्रकारांशी बोलताना जुलै मधील त्यांच्या युरोपदौऱ्या दरम्यान पुतीन यांची भेट घेणार असल्याची शक्यता वर्तवली होती.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)