ट्रम्प-किम जोंग ऊन भेटीची तारीख निश्‍चित नाही, पण तयारी सुरू – व्हाईट हाऊस

वॉशिंग्टन (अमेरिका) – ट्रम्प-किम जोंग ऊन भेटीची तारीख निश्‍चित ठरलेली नसली, तरी त्याबाबत तयारी करणे सुरू असल्याची माहिती व्हाईट हाऊसने दिली आहे. ट्रम्प-किम जोंग ऊन यांच्या भेटीबाबत प्यांग्योंगच्या प्रस्तावाला अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांनी होकार दिलेला असून जरी भेटीची तारीख अद्याप निश्‍चित झालेली नसली, तरी त्यासाठी तयारीला सुरुवात झाली आहे, असे व्हाईट हाऊसच्या प्रेस सचित सारा सॅंडर्स यांनी सांगितले आहे. निमंत्रण पाठवण्यात आले आहे आणि स्वीकारण्यातही आले आहे, असे त्यांनी सांगितले.

अमेरिका आणि डीपीआरके (डेमॉक्रेटिक पीपल्स रिपब्लिक ऑफ कोरिया यांच्या भेटीच्या कार्यक्रमाबाबत आमचे कार्य चालू राहील. या संदर्भात अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प आंणि रिपब्लिक ऑफ कोरिया यांच्यात काही दिवसांपूर्वी चर्चा झाली होती, असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्‍त्या हीथर नॉर्ट यांनी या संबंधात जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)