वॉशिंग्टन: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांच्यात चर्चेची आणखी एक फेरी होण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी अमेरिकेचे अधिकारी उत्तर कोरियन अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आहेत अशी माहिती अमेरिकन सूत्रांनी दिली. या दोन्ही नेत्यांची पहिली चर्चा सिंगापुरमध्ये गेल्या जून महिन्यात झाली होती. त्यात निश्‍चीत झालेले मुद्दे आणखी पुढे नेण्यासाठी ही दुसरी फेरी आवश्‍यक आहे त्यानुसार या भेटीच्या तारखा ठरवल्या जात आहेत असे या सूत्रांनी सांगितले.

स्वत: किम जोंग यांनीच या चर्चेसाठी पुढाकार घेतला असून त्यांनी तसे पत्र अमेरिकन अध्यक्षांना पाठवले आहे. या पत्रातील मजकूर अत्यंत सौजन्यशील असून त्यात अमेरिकन अध्यक्षांबरोबरील चर्चेची प्रकिया पुढे सुरू ठेवण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे अशी माहिती व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी सारा सॅंडर्स यांनी दिली. या पत्राची प्रत माध्यमांना देण्यास मात्र त्यांनी नकार दिला. स्वत: किम जोंग यांनी अनुमती दिली तरच आम्ही ही प्रत प्रसिद्धीसाठी देऊ शकतो असे सॅंडर्स यांनी सांगितले. अमेरिकेचीही त्यांच्याशी चर्चा करण्याची इच्छा आणि तयारी आहे असेही त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)