‘ट्रम्पशिवाय शेतकऱ्यासोबतही सुकलेले शेत पाहताना एक तरी फोटो येऊ द्या’

बीड – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. ट्रम्पसोबत फोटो काढता तसे माझ्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसोबत सुकलेले शेत पाहतानाही फोटो काढा, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. उद्धव ठाकरे आज मराठवाडा दौऱ्यावर असून दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करणार आहेत. यावेळी ते बोलत होते.

उद्धव ठाकरे म्हणाले कि, महाराष्ट्रात पंतप्रधानांचे स्वागत आहे. परंतु, मला म्हणायचं आहे, जसे तुम्ही विदेश दौऱ्यावर जात तसे आमच्या मराठवाड्याला भेट द्या, अशी विनंती आहे. तुमचा ट्रम्प आणि इतर देशातील राष्ट्राध्यक्ष तसेच पंतप्रधानांसोबत फोटो येईल. पण कधीतरी शेतकऱ्यांसोबत सुकलेले शेत पाहताना एक तरी फोटो येऊ द्या, अशी टीका त्यांनी केली. सरकारने तळे दिले पण त्यात पाणी कोणी देणार? असा सवालही त्यांनी विचारला. पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले कि, इथून पुढे शेतकऱ्यांनी आत्महत्येचा विचारही मनात आणयचा नाही त्यांच्यासाठी शिवसेना सदैव सज्ज आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी चारा छावण्यासंबंधी वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा समाचार घेताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘काही बातम्या पाहिल्या की तळपायाची आग मस्तकात जाते. मध्यंतरी एक बातमी वाचनात आली की गुरांना द्यायला चारा नसेल, तर पाहुण्यांकडे नेऊन सोडा. असे जे बोलणारे मंत्री आहेत त्यांना कसाईवाड्यात नेऊन सोडले पाहिजे. हा निर्लज्जपणा शिवसेनेला जमणार नाही, अशी टीका त्यांनी केली.

दरम्यान, मराठवाडा दौऱ्यात शिवसेनेकडून दुष्काळग्रस्तांसाठी मोठी मदत मोहीम राबवली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)