ट्रम्प यांचा भारत दौऱ्याबाबत अंतिम निर्णय नाही

वॉशिंग्टन – पुढील वर्षी प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या सोहळ्यासाठी भारत सरकारने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना निमंत्रण पाठवलेले आहे. मात्र भारताच्या या निमंत्रणाबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी अजुन पर्यंत कोणताच निर्णय घेतलेला नाही. व्हाइट हाऊसच्या माध्यम प्रवक्ता सारा सॅंडर्स यांनी सांगितले की ट्रम यांना भारत सरकारकडून अधिकृत निमंत्रण मिळाले आहे, मात्र त्यांनी भारत दौऱ्याबाबत अंतिम निर्णय घेतलेला नाही.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना भारत दौऱ्यासाठी निमंत्रण मिळाले आहे. मात्र राष्ट्राध्यक्षांनी या निमंत्रण स्वीकारण्याबातत अंतिम निर्णय घेतला आहे, असे मला वाटत नाही. असे सारा सॅंडर्स म्हणाल्या 2019 मध्ये होणाऱ्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून भारताने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना निमंत्रित केले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दिलेल्या निमंत्रणाबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देतान सॅंडर्स यांनी ही माहिती दिली. तसेच या निमंत्रणाबाबत चर्चेमध्ये राष्ट्राध्यक्षांच्या पुढील वर्षी होणाऱ्या दौऱ्यांबाबत चर्चा होईल असेही त्यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्याच बरोबर पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, भार आणि अमेरिका हे देश चांगले मीत्र आहेत आणि आम्ही ही मैत्री कायम अबाधित राखणार आहोत, त्या संदर्भात येत्या सप्टेंबर महिण्यात होणाऱ्या बैठकीत घेतल्या गेलेल्या निर्णया वरून तुम्हाला त्याचा प्रत्यय येइलच असेही त्या म्हणाल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)