ट्रक लावण्याच्या वादातून मारहाण, दोघांना सक्तमजुरी

पुणे – बोअरवेल पाडण्यासाठी आणलेला ट्रक लावण्याच्या वादातून मारहाण केल्याप्रकरणी दोघांना न्यायालयाने एक वर्ष सक्तमजुरी आणि प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.सी. खैरनार यांनी हा आदेश दिला आहे. दंडातील रकमेपैकी जखमींना प्रत्येकी तीन हजार रुपये देण्यात यावेत, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.

योगेश अशोक ढोरे (वय 39) आणि सचिन अशोक ढोरे (वय 44 रा. शेवाळेवाडी, ता.हवेली) अशी शिक्षा झालेल्या दोघांची नावे आहेत. सुभाष तुकाराम ढोरे यांनी यासंदर्भात लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. ही घटना 9 फेब्रुवारी 2013 रोजी घडली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील प्रभाकर तरंगे यांनी काम पाहिले.

सचिन आणि योगेश या दोघांनी त्यांच्या मोकळ्या जागेत बोअरवेल पाडण्यासाठी ट्रक आणला होता. त्यावेळी सुभाष ढोरे यांच्या पत्नीने त्यांना बोअरवेल ट्रक जागेत मावत नाही असे सांगितले. मात्र, त्यांनी त्यांचे न ऐकता घरासमोरील पायऱ्या तोडण्यास सुरुवात केली. त्यावेळी सुभाष यांच्या पत्नींला मारहाण करण्यात आली. त्यावेळी सुभाष हे घरातून बाहेर आले. तेव्हा सचिन आणि योगेश हे बोरअवेलचा ट्रक लावण्यास जागा करण्यासाठी घरासमोरील पायऱ्या तोडत असल्याचे त्यांना दिसले. त्यामुळे सुभाष यांनीही पायऱ्या तोडू नका, असे सांगितले. त्यामुळे चिडून सचिन आणि योगेश यांने सुभाष यांना लाकडी बांबूने मारहाण केली. त्यावेळी सुभाष यांचा मुलगा समीर भांडणे सोडविण्यासाठीमध्ये पडला. योगेश आणि सचिन यांनी त्यालाही मारहाण केल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. याप्रकरणी न्यायालयाने योगेश आणि सचिन याला 1 वर्षाची शिक्षा सुनावली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)