ट्रक पळविण्यामागील मास्टरमाइंड कोण?

शिरूर- शिरूर तालुक्‍यातील तहसीलदार रणजीत भोसले यांच्या पथकाने जप्त केलेले वाळू वाहतूक करणारे ट्रक बनावट कागदपत्रे दाखवून हे पळवून नेले. हे ट्रक पळून नेणारा आणि बनावट कागदपत्रे तयार करणारा मास्टर माइंड कोण आहे? ही बनावट कागदपत्रे तयार करणारा तहसीलदार कार्यालयातील कर्मचारी आहे की तहसीलदार कार्यालयात फिरणारा दलाल आहे का? आणखी कोणी दुसरा मास्टर माइंड आहे? याबाबत अद्याप उलगडा न झाल्याने हा प्रकार रफादफा होतो की काय? अशी शंका नागरिकांना वाटत आहे.
शिरूर तालुक्‍यात तहसीलदार रणजित भोसले यांनी या अगोदर अनेक वाळू वाहतूक करणारे ट्रक आणि कारवाई केली होती. यातील काही ट्रक वाळू तस्करांनी तहसीलदार कार्यालय आवारातून चोरून नेले होते. त्यात आता नवीन फंडा समोर आला आहे. शिरूर ते तहसीलदार, तालुक्‍यातील मंडलाधिकारी सर्व तलाठी यांनी वेळोवेळी कारवाई करत असताना 12 ऑगस्ट रोजी चार वाळू वाहतूक करणारे ट्रक कारवाई करून जप्त केले होते. ही सर्व वाहने शासकीय गोदाम तळेगाव ढमढेरे येथे ठेवण्यात आली होती. या वाहनमालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांना दंड आकारण्यात आला होता. मात्र, या वाहनमालकांनी दंड भरला नसल्याने त्यांची वाहने तळेगाव ढमढेरे येथील शासकीय गोदामात लावली होती.
शिरूरचे तहसीलदार काही कामानिमित्त तळेगाव ढमढेरे येथील शासकीय गोदामात गेले असताना त्यांनी वेळोवेळी जप्त केलेली चार वाळू वाहतूक करणारी वाहने त्यांना तेथे आढळून आली नाही. याबाबत त्या संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता त्या अधिकाऱ्यांनीही वाहने त्या मालकांनी शिरूर तहसीलदार कार्यालयाचे वाहन सोडण्याचे पत्र आणून घेऊन गेल्याचे सांगितले. आपण कोणालाही ही वाहने सोडावी म्हणून पत्र दिले नाही. तसेच याबाबत आपण कोणालाही पत्र दिले नसल्याचे शिरूरचे तहसीलदार रणजित भोसले यांच्या लक्षात आले. त्यांनी वाहने सोडण्याचे दिलेले पत्र तपासले असता हे पत्र बनावट सहीचे असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्याचे जावक पत्राची तपासणी केल्यानंतर हे पत्र बनावट असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे बनावट कागदपत्रे तयार करून वाहने नेल्याचा गुन्हा दाखल केला आहे. परंतु याबाबत आत्तापर्यंत ठोस कारवाई केली नसल्याचे दिसून आले आहे. हा सर्व प्रकार गंभीर असून ही बनावट कागदपत्रे आणि बनावट सही करणारा मास्टरमाईंड कोण? याबाबत तालुक्‍यात उलटसुलट चर्चा होत आहे. याला राजकीय किनार असल्याचे बोलले जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)