• एकजण गंभीर : बेल्हे गुंजाळवाडी शिवारातील घटना

बेल्हे – रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला मागून दुचाकी धडक बसून झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर, एकजण गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना मंगळवारी (दि.4) रात्री साडेआठच्या सुमारास अहमदनगर-कल्याण महामार्गावर बेल्हे गुंजाळवाडी शिवारात घडली. भाऊसाहेब आनंदा पवार (वय 30 वर्ष)असे अपघातात ठार झालेल्याचे नाव आहे. तर गंभीररीत्या जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव शिवाजी रामभाऊ बोरचटे असे आहे. हे दोघेही गुंजाळवाडी, बेल्हे येथील रहिवासी आहेत.
याबाबत आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक नरेंद्र गोरणे यांनी दिलेली माहिती अशी, मयत पवार आणि जखमी बोरचटे हे दोघे एका मोटारसायकलवरून आळेफाट्याहून गुंजाळवाडी येथे घरी परतत असताना त्यांच्या मोटारसायकलची सह्याद्री अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर उभ्या असलेल्या ट्रकला मागून धडक बसून अपघात झाला, अशी खबर मयताचे चुलत भाऊ नितीन मच्छिंद्र पवार यांनी दिली आहे. यावरून आळेफाटा पोलीस ठाण्यात मयत म्हणून नोंद केली आहे. याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्योती ढमाले या करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)