ट्रक ट्रेलर आणि टायर परिसंवादाला प्रतिसाद

गांधीनगर: भारतीाल मालवाहतुकीचा व्याप पाहता या क्षेत्रात आधुनिक माहिती तंत्रज्ञान आणि उत्पादने येण्यासाठी वातावरण निर्मिती करण्यासाठी आयोजित ट्रक ट्रेलर आणि टायर एक्‍स्पोचे उत्तम प्रतिसाद मिळाला. या एक्‍स्पोत भारतातील आणि परदेशातील अनेक कंपन्यानी सहभाग नोंदविला. यामुळे हा उद्योग विकसित होण्यास हाताभार लागणार असल्याचे टाटा इंटरनॅशनल डीएलटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव बत्रा यानी सांगितले. ते म्हणाले की, या क्षेत्रात नवे तंत्रज्ञान आल्यास कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार आहे.
टाटा इंटरनॅशनल डीएलटीने यावेळी भारतातील पहिला इंटेलिजंट ट्रेलर लॉंच केला. ट्रेलर चालवण्याच्या तसेच देखरेखीच्या अनुकूलनासाठी आवश्‍यक ती माहिती हे तंत्रज्ञान चालकाला व ताफा व्यवस्थापकाला पुरवते. त्यामुळे मानवी पाठपुराव्यावरील अवलंबित्व कमी होण्याबरोबरच अपघातांची संख्या कमी होते. ऑटोमोटिव रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाने प्रमाणित केलेली ही भारतातील पहिली उत्पादन कंपनी आहे. हे वजनाने हलके ट्रेलर्स अधिक भार वाहण्याच्या दृष्टीने विकसित करण्यात आले असून यामुळे नफ्याची शक्‍यता वाढते, असा दावा त्यानी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)