ट्रक चालकास लुटणारा सात वर्षांनी जेरबंद

नागठाणे, दि. 1 (प्रतिनिधी) – काशीळ, ता. सातारा येथे ट्रकचालकास धाक दाखवून लुटणारा संशयीत तब्बल सात वर्षांनी पोलिसांच्या जाळ्यात अडकला. संतोष गबाजी मोहिते (वय 36, रा. चव्हाणवाडी, ता. शिरूर, जि. पुणे) असे या संशयिताचे नाव आहे.
याबाबत जयवंत सोमाण्णा व्हनमाने (रा. जयसिंगपूर, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) या ट्रकचालकाने फिर्याद दिली होती. त्यानुसार मोहिते व अन्य तीन संशयितांनी चाकूचा धाक दाखवून ट्रकमधील तिघांना लुटले होते. यावेळी संशयितांनी तीन मोबाईलसह रोख रक्कम पळविली होती. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली होती. मोहिते व अन्य पोलिसांना गेली सात वर्षे गुंगारा देत होते. मात्र, पोलिसांनी संतोष मोहितेला अखेर जेरबंद केले. सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष चोैधरी यांच्या मार्गदर्शनाखाली फोैजदार खान तसेच स्वप्नील माने, राजू शिखरे, विजय साळुंखे या पोलिसांनी ही कामगिरी केली. गुन्ह्याची नोंद बोरगाव पोलिस ठाण्यात झाली आहे.

What is your reaction?
13 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)