ट्रक चालकांना लुटणाऱ्याला अटक

सातारा, दि.13 (प्रतिनिधी)
महामार्गावर ट्रकला दुचाकी आडवी मारून लुटणाऱ्या एकाला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. महामार्गावर लुटीचा प्रकार सतत होत असल्याने जिल्हा पोलिस प्रमुखांनी कारवाईचे आदेश दिले होते. अक्षय दिपक अवघडे (वय 25, रा.आसगाव रेल्वे फाट्याजवळ वडूथ ता.सातारा) असे पोलिसांनी अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.महामार्गावर गेल्या काही महिन्यांपासून ट्रक चालकांना थांबवून लुटमार होत असल्याचे प्रकार घडत होते. एलसीबीच्या पथकाला याबाबत माहिती मिळाल्यानंतर ते पाळत ठेवून होते. एक युवक क्रमांक नसलेल्या दुचाकीवरुन संशयितरीत्या फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याच्यावर पाळत ठेवली असता, तो तळबीड परिसरात असल्याने तळबीड पोलिसांशी संपर्क ठेवून संशयिताला ताब्यात घेण्यात आले.ताब्यातील आरोपीकडे पोलिसांनी प्राथमिक चौकशी केल्यानंतर त्याने सहा महिन्यांपूर्वी व दोन महिन्यांपूर्वी ट्रक चालकांना थांबवून लुटमार केली असल्याची कबुली दिली. दरम्यान, ज्या ट्रक चालकांची लुटमार झालेली आहे त्यांनी त्या पोलिस ठाण्याशी संपर्क करुन तक्रारी द्याव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)