ट्रक उलटून 13 जवान जखमी 

श्रीनगर: जम्मू काश्‍मीरच्या शोपियॉं जिल्ह्यात लष्करी जवानांना घेऊन जाणारा एक ट्रक उलटल्याने झालेल्या अपघातात तेरा जवान जखमी झाल्याचा प्रकार आज येथे घडला. शनिवारी सकाळी कानीपोरा गावाजवळ हा प्रकार घडला. जखमी जवानांना जवळच्याच रूग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्या सर्वांची प्रकृती धोक्‍याबाहेर आहे असे सांगण्यात येते.
ट्रक नेमका कसा उलटला याची माहिती उपलब्ध झाली नाही. हा ट्रक लष्करी जवानच चालवत होता असे काही सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे हा घातपाताचा प्रकार नाहीं हेही स्पष्ट करण्यात आले आहे. दक्षिण काश्‍मीर मध्ये लष्कराचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे. तेथे जवानांची येजा करण्यासाठी लष्कराच्याच ट्रकचा वापर केला जातो.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)