ट्रकला लागलेल्या आगीत प्रचंड नुकसान

कापूरहोळ- पुणे -सातारा महामार्गावर काल (मंगळवारी) मुंबईवरून साताऱ्याकडे निघालेला एक मालवाहतूक धावत्या ट्रकने सकाळी अचानक पेट घेतला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, ट्रक जळून भस्मसात झाला. ट्रकमधील कपडे, घरसामान स्टेशनरी व इतर लाखो रुपयांचे किमती साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले.

धांगवडी (ता. भोर) गावच्या हद्दीत सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली आहे. महामार्ग वाहतूक पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, किमती वस्तू वाहून नेणारा ट्रक (एमएच 11 एएल 5493) साताऱ्याच्या दिशेने निघाला होता. सकाळी सातच्या सुमारास हा ट्रक धांगवडीच्या हद्दीत आला असताना ट्रकच्या मागील बाजूस अचानक आग लागली. यावेळी पाठीमागून जाणाऱ्या प्रवाशांनी चालकाला आग लागल्याचे सांगितले. यावेळी चालकाने प्रसंगावधान राखत ट्रक महामार्गच्या बाजूला घेऊन चालक आणि क्‍लिनर यांनी माती टाकून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीने अधिक पेट घेतल्याने ट्रक जळून खाक झाला.

सकाळी नऊच्या सुमारास अग्नीशमक दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पेटलेला ट्रक विझविण्यात आला. व जेसीबीच्या साहाय्याने जळालेल्या ट्रकचे अवशेष हटविण्यात आले. मागील आठवड्यात पुणे-सातारा महामार्गावर शिवरे येथे अशीच घटना घडली होती. त्यामुळे महामार्गावर अग्नीशमन व्यवस्था असणे गरजेचे झाले आहे. भरमसाठ टोल देऊन ही अशी व्यवस्था उपलब्ध नसल्याने नागरिक तीव्र भावना व्यक्‍त करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)