पुणे जिल्हा: ट्रकमधून सांडतेय वाळू अधिकाऱ्यांची भरलीय “टाळू’

file photo

टोल नाक्‍यावरील कॅमेऱ्यात…
वाळू वाहतूक बहुतांशी ट्रक मधून केली जाते. परंतु, वाळू झाकलेली नसल्याने तसेच ट्रक वेगाने असल्याने खड्ड्यांतून गेल्याने वाऱ्यामुळे ती रस्त्यावर सांडते. वाळू वाहतूक करणाऱ्या याच ट्रक टोलनाक्‍यावरून जातात. टोल देतात की नाही, हा वेगळा विषय असला तरी कॅमेऱ्यात या ट्रक टिपल्या जातात. या आधारे महसूल तसेच पोलीस बेकायदा वाळू ट्रक पकडून शकतात. परंतु, अधिकाऱ्यांकडून अशा प्रकारे एकदाही प्रयत्न झालेला नाही.

प्रादेशिक परिवहन प्राधिकरण नियमाकडे दुर्लक्षमुळे बेकायदा धंदा उघड

पुणे-सोलापूर महामार्गावरील स्थिती

लोणीकाळभोर – जिल्ह्यात सध्या सर्वत्र वाळू उपसा आणि बेकायदा वाळू वाहतुकीचा धंदा फोफावला आहे. शासकीय अधिकाऱ्यांकडून कारवाई केली असल्याचा भोंगा वाजविला जात असला तरी पुणे-सोलापूर महामार्गावर दौंड ते लोणी काळभोर पर्यंत ट्रकमधून सांडलेल्या वाळू मुळे या बेकायदा धंद्याचा भांडाफोड रोजच होत आहे. हडपसर हद्दीत मांजरी फार्म फाट्यालगत रोज सकाळी 06:00 वाजता फुटणारा होलसेल वाळूचा बाजार अवघ्या अर्ध्यातासात उरकतो आणि वाळूने भरलेल्या गाड्या पुण्याकडे रवाना होतात. वाळू न झाकताच होणारा हा धंदा अधिकाऱ्यांना कसा काय दिसत नाही? याचे कोडे नागरिकांना आहे.

जिल्ह्यात वाळू उपशाला बंदी असताना वाळू उपसा आणि वाहतूक सर्रास होते. दिवसा कारवाई होत असल्याने रात्रीच्या वेळी नदीपात्रातून वाळू उपसा तसेच वाहतूक केली जाते. परंतु, ट्रकमधून सांडणारी वाळू रोजच दौंड ते लोणीकाळभोर आणि त्यापुढे दिसत असल्याने वाळू वाहतूक जोमाने सुरू असल्याचे उघड आहे.

ट्रक किंवा ट्रॅक्‍टरमधून वाळूची वाहतूक करताना वाळू ताडपत्रीने झाकलेली असणे आवश्‍यक असून हा नियम न पाळणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करावी, असे आदेश प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे तत्कालीन अध्यक्ष आणि विभागीय आयुक्‍त दिलीप बंड यांच्या कार्यकाळात दिले गेले होते. विशेषत: ग्रामिण भागात ही कारवाई आरटीओ आणि पोलिसांकडून संयुक्तपणे करण्यात यावी, असेही प्रादेशिक परिवहन प्राधिकरणतर्फे सांगण्यात आले होते. परंतु, वाळू वाहतुकीवरच कारवाई होत नाही तर हा नियम कोण पाळणार? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. परंतू, वाळू वाहतूक उघड्यावर होत असल्याने ट्रक मधून ती रस्त्यावर सांडत असल्याने नियम न पाळणाऱ्यांची चोरी यातून उघड होत आहे.

जिल्ह्यातून दररोज मोठ्या प्रमाणावर वाळूची वाहतूक होते. पुणे-सोलापूर महामार्ग, पुणे-नगर महामार्ग, सातारा आणि नाशिक महामार्गावरून रोज शेकडो ट्रकमधून वाळू वाहतूक केली जाते. यामध्ये वाळू वाहतुकीसाठी पुणे-सोलापूर महामार्ग (रात्री/पहाटे) सर्वात व्यस्त समजला जातो. प्रादेशिक परिवहन विभागाकडून अडीच ब्रास वाळू भरण्यास परवानगी आहे. ही वाळू रस्त्यावर सांडून महामार्गांवर अपघात घडू नयेत याकरिता वाळू ताडपत्रीने झाकून वाहतूक करण्याचा नियम लागू करण्यात आला होता. परंतु, वाळू माफियांकडून उपसाच बेकायदा होत असल्याने वाहतुकीचे काय नियम पाळणार? परंतु, याच गोष्टीमुळे वाळू उपसा आणि वाहतूक जोरात सुरू असल्याचे उघड होत असून कारवाई होत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणजे केवळ भोंगा वाजविण्याप्रमाणे असल्याची वस्तुस्थिती आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)