ट्रकमधून किराणा माल चोरीस

म्हसवड – म्हसवड येथिल रामोशी वेशी जवळील प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ उभ्या असलेल्या मालवाहू ट्रकमधून 74 हजारांचा किराणा माल चोरट्यांनी लंपास केला. याबाबतची तक्रार ट्रकमालक विजय सिध्देश्‍वर तवटे यांनी म्हसवड पोलिसांत दिली आहे. याबाबत घटनास्थळावरून व म्हसवड पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, म्हसवड येथील विजय तवटे यांचा मालवाहतूक ट्रक (एमएच11 एम 5565) हा पुणे मार्केटयार्ड येथून 30 डिसेंबर रोजी म्हसवड येथील किराणा व्यापाऱ्यांचा किराणा माल भरून म्हसवड येथे आला होता.

यातील काही माल हा रात्री व्यापाऱ्यांनी उतरून घेतला व राहिलेला माल सकाळी उतरायचा होता म्हणून माल भरलेला ट्रक प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ रात्री वाजता लावण्यात आला होता. सकाळी ट्रकचे चालक व मालक विजय तवटे यांनी पाहिले असता ट्रकच्या हौद्यातील ताडपत्री उचकटल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांना ट्रकमधील माल चोरीला गेल्याचे लक्षात आले. तवटे यांनी म्हसवड पोलिस स्टेशनला तक्रार दिली असून ट्रकमधील सौद्याचा माल असलेले 10 पोती मिरे, 2 पोती खोबरा खिस, व सायकलचे सामानाचा एक डाग असा माल चोरट्यांनी चोरून नेला. याप्रकरणी पो. कॉ. राहुल कुंभार तपास करत आहेत.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)