ट्रकच्या धडकेत दोन मजूर जखमी

देहूरोड – जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर देहूरोड येथे उड्डाणपुलाचे काम सुरु असताना ट्रकची धडक बसल्याने दोन मजूर गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात बुधवारी (दि. 31) रोजी दुपारी सव्वा तीनच्या सुमारास घडला.
रामजीवन खामरी (वय-29, सध्या रा. देहूरोड, मूळ रा. पाचोडा, झारखंड), बाणी चामटू दलाई (वय-28, सध्या रा. देहूरोड, मूळ रा. नोटा, पश्‍चिम बंगाल) अशी जखमी मजुरांची नावे आहेत.

घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, देहूरोड येथे मुंबई-पुणे महामार्गावरील उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या उड्डाणपुलाच्या पोल क्रमांक 16 जवळ बुधवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास क्रेन (एमजेके 1394) च्या लोखंडी झुल्यावर दोन मजूर कोणत्याही सुरक्षित साहित्याविना पुलाचे काम करीत होते. तसेच, शेजारील सेवा रस्त्यावरून वाहतुकीची वर्दळ सुरू होती. या सेवा रस्त्यावरून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रकची क्रेनच्या झुल्याला जोरदार धडक बसून खामारी हा मजूर सुमारे 20 फूट उंचीवरून खाली पडला. तर दलाई याला जबर मार लागून लोखंडी जाळीच्या झुल्यात अडकून राहिला. या मार्गावर अवजड वाहनांना प्रवेश बंदीचे जिल्हाधिकारी यांचे आदेश असतानाही मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक सुरुच आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)