ट्रकच्या धक्‍क्‍याने दुचाकीस्वारचा मृत्यू

बेल्हे- ट्रकने दुचाकीला धडक देऊन झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला. ही घटना मुंबई-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर सकाळी साडेसातच्या सुमारास, बेल्हे (गुंजाळवाडी) नजीक घडला. या घटनेत मृत झालेल्या व्यक्तीचे नाव अन्वर हुसेन शेख (वय 45, रा. बेल्हे) असे आहे.
याबाबत आळेफाटा पोलीस ठाण्याच्या पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, बेल्हे येथील अन्वर हुसेन शेख हे नेहमीप्रमाणे भांडी विक्रीकरीता त्यांच्या दुचाकीवरून मुंबई-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावरून बेल्ह्याकडून राजुरीकडे जात होते. गुंजाळवाडी फाट्यावर पाठीमागून आलेल्या ट्रकने धडक दिल्याने ते खाली कोसळले, त्यांचा जागीच मृत्यू झाला असून, ट्रक चालक पसार झाला आहे. याबाबत आळेफाटा पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक गणेश उगले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्योती ढमाले करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)