ट्रकच्या ओझ्याने ग्रेड सेपरेटचा भराव खचला

सातारा,दि.5 (प्रतिनिधी) -गणेश उत्सव काळात होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेत, प्रशासनाने पोवई नाक्यावरून जाणार ग्रेड सेपरटरचा एक मार्ग मोकळा केला होता. मात्र त्यावरून अवजड वाहनांना प्रवेश नाकारला होता, असे असतानाही शुक्रवारी लोखंडी बांधकाम साहित्याने भरलेला ट्रक जात असताना भराव खचल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. अखेर वाहतूक पोलिसांनी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.
शुक्रवारी सकाळी बांधकाम साहित्य घेऊन निघालेल्या ट्रकच्या वजनाने एका बाजूचा भराव खचला. ट्रक रस्त्यात अडकून पडल्याने वाहतूक कोंडी होवू लागली. ट्रक बाहेर काढण्यासाठी पोलिसांना क्रेनची मदत घ्यावी लागली. गेल्या दोन-तीन दिवसांपासून सातारा शहरात सुरू असलेल्या पावसाने भराव खचल्याचे बोलले जाते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)