ट्रकच्या ओझ्याने ग्रेड सेपरेटचा भराव खचला

file photo

सातारा- गणेश उत्सव काळात होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेत, प्रशासनाने पोवई नाक्‍यावरून जाणार ग्रेड सेपरटरचा एक मार्ग मोकळा केला होता. मात्र त्यावरून अवजड वाहनांना प्रवेश नाकारला होता. असे असतानाही शुक्रवारी लोखंडी बांधकाम साहित्याने भरलेला ट्रक जात असताना भराव खचल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. अखेर वाहतूक पोलिसांनी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.

शुक्रवारी सकाळी बांधकाम साहित्य घेऊन निघालेल्या ट्रकच्या वजनाने एका बाजूचा भराव खचला. यामुळे ट्रक रस्त्यात अडकून पडला होता. वाहतूक कोंडी वाढत असल्याने ट्रक बाहेर काढण्यासाठी पोलिसांना क्रेनची मदत घ्यावी लागली. यामुळे सुमारे अर्धा तास वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. गेल्या दोन-तीन दिवसांपासून सातारा शहरात सुरू असलेल्या पावसाने भराव खचल्याचे बोलले जाते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)