ट्रकचे चाक डोक्‍यावरून गेल्याने तरुणाचा मृत्यू

लोणी काळभोर- कामावरून घरी परतत असलेल्या इंजिनियर तरुणाच्या दुचाकीस ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना दुचाकीच्या हॅन्डलला चारचाकीची धडक बसल्याने दुचाकीस्वार रस्त्यावर पडला आणि याचवेळी मागून आलेल्या ट्रकचे चाक डोक्‍यावरून गेल्याने तरुण जागीच मृत्यू झाल्याची घटना पुणे-सासवड मार्गावर सोमवारी (दि. 23) रात्री घडली. या अपघातात वैभव नंदकुमार उबाळे (वय 28, रा. हाडको, सासवड, ता. पुरंदर ) या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याचा मोठा भाऊ विक्रम नंदकुमार उबाळे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून लोणी काळभोर पोलिसांनी दोन अज्ञात वाहनचालकांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वैभव उबाळे हा होळकरवाडी (ता. हवेली) येथील खासगी कंपनीत इंजिनियर होता. कामावर ये-जा करण्यासाठी दुचाकी (क्र. एमएच 12, केएम 6106) वापरत असे. सोमवारी (दि. 23) रात्री कामावरून सुटल्यानंतर घरी जात असताना एका ट्रकचे चाक डोक्‍यावरून गेल्याने या तरुणाचा मृत्यू
ही घटन रात्री 10 च्या सुमारास वडकी गावच्या हद्दीत घडली. मागील बाजूने भरधाव आलेल्या कारने (क्र. एमएच 12 केएन 8719) मधील अज्ञात चालकाने त्याला ओलांडून पुढे जाण्याच्या प्रयत्नात दुचाकीच्या हॅन्डलला धडक दिली. यांमुळे वैभव दुचाकीसह रस्त्यावर पडला. यांचवेळी हडपसरकडून सासवडकडे निघालेला ट्रक (क्र. एमएच 12 सीटी 8661) आला. त्याचा वेग जास्त असल्याने त्यांवरील अज्ञात चालकाला नियंत्रण ठेवणे अवघड गेले. त्या ट्रकच्या चाकाखाली वैभव आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेस कारणीभूत असलेले कार आणि ट्रकचालक तेथे न थांबता आपापली वाहने घेऊन निघून गेले. मात्र, दोन्ही वाहनांचे क्रमांक मिळाले असल्याने त्यांच्यापर्यंत पोहचणे सोपे झाले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)