ट्रकची धडक लागून दुचाकीस्वार जखमी

वाघोली- ट्रकची दुचाकीस धडक बसल्याने दुचाकीवरील युवक जखमी झाल्याची घटना वाघोली-लोहगाव चौकात दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला असून याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात अपघाताची तक्रार देण्यात आली आहे. जुनेद समिर शेख (रा. वाघोली) असे अपघातात जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. ट्रकने दुचाकीला धडक दिल्यानंतर जखमी झालेल्या जुनेदला ग्रामस्थांनी तात्काळ लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्याची प्रकृती स्थिर असून, उपचारासाठी पुणे येथे पाठविण्यात आले असल्याची माहीती डॉक्‍टरांनी दिली. जुनेद शेख हा पुणे शहर पोलीस दलाचे एसीपी समीर शेख यांचा मुलगा असून शेख कुटुंब वाघोली येथे वास्तव्यास आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)