टोळक्‍याकडून तिघांना मारहाण

पिंपरी – वाकड येथे जुन्या भांडणाच्या रागातून टोळक्‍याकडून तिघांना मारहाण केली आहे. ही घटना वाकड येथील काळाखडक येथे रविवारी (दि.25) रात्री आठ वाजता घडली.

याप्रकरणी शांताबाई भारत जाधव (वय-45, रा.काळाखडक झोपडपट्टी, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून. पोलीस ठाण्यात कल्याणी मोदले, संजय मोदले, अंकुश कोचे, प्रदीप पाटोळे व इतर तीन जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा किरण जाधव याची आरोपी कल्याणी मुदले हिच्या शनिवारी (दि.24) सोबत किरकोळ वाद झाला होता. याच वादाचा राग मनात धरून कल्याणी व तिच्या साथीदारांनी फिर्यादीची नात पूर्वा गुंजाळ व त्यांचा ओळखीचा इसम दिलीप खुळे हे अंगणात बसले असताना आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत लाकडी दांडक्‍याने मारहाण केली. तसेच त्यांच्या शेजाऱ्यांनाही शिवीगाळ केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)