टोळक्‍याकडून तरुणाला मारहाण

पिंपरी – ध्वजारोहणास गेलेल्या तरुणाला टोळक्‍याने बेदम मारहाण केली आहे. ही घटना शनिवारी (दि. 26) रोजी सकाळी आठच्या सुमारास पिंपरी येथे घडली.

याप्रकरणी निकुल उर्फ कुणाल सुनील वेताळ (वय-19, रा. गांधीनगर, पिंपरी) यांनी फिर्याद दिली असून वैभव हटांगळे (वय-21, रा. घरकुल चिखली) व त्याचे आठ साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या भांडणाच्या रागातून आठ जणांच्या टोळक्‍याने निकुल याला सिमेंटचे गट्टू व लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण केली. यावेळी निकुलच्या डोक्‍याला जबर मार लागल्याने तो चक्कर येवून खाली कोसळला. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात निकुलने रविवारी (दि. 27) फिर्याद दिली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)