टोळक्‍याकडून तरुणाला मारहाण

पिंपरी – सहा जणांच्या टोळक्‍याने तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण केली. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी भोसरी मधील गवळीनगर येथे घडली.

प्रणव बाळासाहेब गवळी (वय-19, रा. भवानी ट्रेडर्स समोर, गवळीनगर, भोसरी) या तरुणाने याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मंगेश मोरे (वय-21, रा. गव्हाणे पेट्रोल पंपामागे) आणि अन्य पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रणव रविवारी दुपारी दीडच्या सुमारास गवळीनगर येथे त्याच्या आते बहीण व तिच्या मैत्रिणीसोबत बोलत थांबला होता. त्यावेळी आरोपी त्याच्या पाच साथीदारांसोबत तिथे आला. त्याने लोखंडी रॉड आणि बांबूने प्रवण याला मारहाण केली. यामध्ये प्रणवच्या हाताला, डोक्‍याला व चेहऱ्यावर गंभीर इजा झाली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)