टोळक्‍याकडून एकावर कोयत्याने वार

चाकण-औद्योगिक वसाहतीतील कंपनीमध्ये भाडे तत्त्वावर चारचाकी वाहन का लावत नाही? म्हणून चारजणांच्या टोळक्‍याने शिवीगाळ करीत मारहाण करून लोखंडी कोयत्याने एकावर वार केल्याची घटना काल रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बोरदरा येथील संधार कंपनीच्या गेट समोर घडली.
या मारहाणीमध्ये संदीप सुरेश पडवळ ( वय 23, रा. बोरदरा, पो. आंबेठाण, ता. खेड) हा तरुण गंभीररित्या जखमी झाला असून याबाबतची फिर्याद आकाश बाळासाहेब शेळके यांनी चाकण पोलीस ठाण्यात दिली आहे. संदीप पडवळ याने दिपक उर्फ पांडा रोहिदास घनवट याचा दाजी अमर सुभाष बधाले याची चारचाकी वाहने बोरदरा येथील संधार व लिंक या कंपनीमध्ये भाडेतत्वावर लावली नाही, या रागातून चिडून जाऊन काल रात्री आठ वाजण्याच्या सुमारास दीपक उर्फ पांडा रोहिदास घनवट (रा. कोरेगाव खुर्द, ता. खेड), विठ्ठल नवनाथ पिकळे (रा. कोरेगाव खुर्द, ता. खेड), राजेश हनुमंत कांबळे (रा. नेहरू नगर, पिंपरी, पुणे), मयूर मंडले (पूर्ण नाव माहीत नाही, रा. बोरदरा) या चौघांनी दोन मोटारसायकलवर येऊन संदीप पडवळ यांस शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण केली व आपल्याकडे असणाऱ्या लोखंडी कोयत्याने डोक्‍यावर, तोंडावर, छातीवर वार करून गंभीर जखमी केले. तद्‌नंतर गावातील महिला पोलीस पाटील दिपाली दोंद यांचे पती प्रकाश दत्तात्रय दोंद यांच्या घरात घुसून जुन्या निवडणुकीच्या कारणावरून जीवे मारण्याच्या उद्देशाने कोयत्यांच्या धाकाने शिवीगाळ, दमदाटी व मारहाण करून घटनास्थळावरून पळून गेले. याबाबत चाकण पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक मनोज यादव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)