टोल वसुल करता, मग खड्डे का बुजविले जात नाही

मुंबई – “पावसाळा आणि रस्त्यावरील खड्डे’ हे आता काही नवीन नाही. गेले 25 वर्षे ही रडकथा सुरू आहे. रस्त्यांवर टोल वसुल करता, तर तो पैसे या खड्ड्यांवर का खर्च केला जात नाही. हे खड्डे का बुजविले जात नाहीत असे प्रश्‍न न्यायालयाने उपस्थित केले.

यावेळी याचिकाकर्त्यांनी या महामार्गावर भरमसाठ टोलवसूल केली जात असताना मोठ्या प्रमाणात झालेल्या खड्ड्यांची जंत्रीच सादर केली. गेल्या दोन वर्षात शेकडो बळी गेले आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असून खड्ड्यांचा त्रास वाहनचालकांना दररोज सोसावा लागत आहे, याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी न्यायालयाने तिव्र नाराजी व्यक्त करत राज्य सरकारला चांगलेच फटकारत राज्य सरकारसह,एमएसआरडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग, सिडकोसह अन्य प्रतिवाद्यांना दोन आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)