टोल नाक्‍यावरील कामगारांची मारहाण

पिंपरी – कार चालकांकडून जबरदस्तीने पैसे घेतले जात असल्याची तक्रार व्यवस्थापकाकडे केल्याच्या रागातून टोलनाक्‍यावर काम करणाऱ्या कामगारांनी कार चालकाला मारहाण केली. ही घटना मोशी टोलनाक्‍यावर घडली.

संतोष गोविंद गोलांडे (वय-46, रा. पिंपरी गाव) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार आकाश शशिकांत तावडे (रा. संजय गांधीनगर, मोशी), अजय दत्तू झाल्टे (रा. बोराटे वस्ती, मोशी), शिवम दत्तात्रय हापसे (रा. कुरुळी, हापसे वस्ती), चांगदेव पोपट जानकर (संजय गांधी नगर, मोशी), प्रशांत सुनील पोतदार (रा. गायकवाड वस्ती, मोशी) आणि अन्य दहा कामगारांविरोधात गुन्हा नोंदविला आहे. या मारहाणीमध्ये संतोष गोलांडे गंभीर जखमी झाले आहेत. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)