टोलनाक्‍यावर व्हीआयपींसाठी स्वतंत्र मार्गिका तयार करा

मद्रास उच्च न्यायालयाचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला निर्देश
चेन्नई – राष्ट्रीय महामार्गावरील सर्व टोल नाक्‍यांवर वाहनांची गर्दी होत असल्याने व्हीआयपींसह विद्यमान न्यायाधीशांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी राष्ट्रीय महामार्गावरच्या सर्व टोल नाक्‍यांवर स्वतंत्र मार्गिका तयार करा, असे निर्देश मद्रास उच्च न्यायालयाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिले आहेत.

व्हीआयपी आणि न्यायाधीशांना टोलनाक्‍यांवर थांबवले जाते हे अतिशय दुर्दैवी आहे. इतकेच नाही तर टोलनाक्‍यावर 10 ते 15 मिनिटे थांबणे भाग पाडले जाते, असे म्हणत न्यायालयाने फटकारले.

-Ads-

लार्सन अँड टुब्रो कृष्णागिरी वलाजपेट टोलवे लिमिटेडसह अनेक याचिकांच्या सुनावणी करताना न्यायमूर्ती हुलुवाडी जी. रमेश आणि न्यायमूर्ती एम. व्ही. मुरलीधरन यांच्या दोन सदस्यीय खंडपीठाने हे निर्देश दिले आहेत. टोल नाक्‍यावर तिष्ठत राहून ओळखपत्र दाखवणे हा व्हीआयपी आणि न्यायाधीशांसाठी खूपच त्रासदायक अनुभव असतो, असे मत खंडपीठाने नोंदविले आहे.

अंतरिम आदेश जारी करताना खंडपीठाने म्हटले आहे की, व्हीआयपींना स्वतंत्र मार्गिका तयार करा, जेणेकरुन ते कोणत्याही अडथळ्याशिवाय जाऊ शकतात. स्वतंत्र मार्गिकेचा विषय सोडवला नाही तर संबंधित सर्व यंत्रणांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाईल, असे न्यायालयाने बजावले.

याबाबत खंडपीठाने केंद्र सरकार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला परिपत्रक जारी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच संपूर्ण देशभरातील राष्ट्रीय महामार्गांसाठी हा आदेश लागू असेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
“प्रत्येक टोल कलेक्‍टरसाठी एक परिपत्रक जारी करा. ज्यात अशाप्रकारची व्हीआयपी मार्गिका तयार करण्यास सांगता येईल. या मार्गिकेतून व्हीआयपी आणि न्यायाधीशांशिवाय दुसऱ्या कोणालाही जाऊ देऊ नये. जे या नियमांचें उल्लंघन करतील, त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्याची जबाबदारी टोल कलेक्‍टरची असेल, असे न्यायालयाने नमूद केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)