टोलनाक्‍याचा धोकादायक कठडा हटवला

पाडेगाव : टोलनाक्‍याचा वाहतुकीसाठी धोकादायक ठरत असलेला कठडा हटविताना बांधकाम विभागाचे कर्मचारी. (छाया : प्रशांत ढावरे)

लोणंद, दि. 5 (प्रतिनिधी) – पाडेगाव येथील टोलनाक्‍याचा कठडा वाहतुकीस अडथळा ठरत होता. वाहनधारकांसाठी धोकादायक ठरणाऱ्या या कठड्यासंदर्भात दैनिक प्रभातने बुधवार, 5 रोजी वृत्त प्रसिद्ध केले होते. रात्रीच्यावेळी हा कठडा दिसत नसल्याने अपघाताची शक्‍यता निर्माण झाली होती. त्यापार्श्‍वभूमीवर येथील साथ प्रतिष्ठानने याठिकाणी रिफ्लेक्‍टर लावले होते. दरम्यान, प्रभातच्या वृत्तानंतर संबंधित विभागाने हा कठडाच काढून टाकल्यामुळे वाहनधारकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
काही दिवसांपूर्वी कंटेनरच्या धडकेत पाडेगाव येथील बंद अवस्थेत असलेल्या टोलनाक्‍याची मोडतोड झाली होती. त्यानंतर हा टोलनाका हटविण्यातही आला. परंतु, याठिकाणी असलेला एक कठडा तसाच ठेवण्यात आला होता. रात्रीच्या वेळी या कठड्याचा अंदाज वाहनधारकांना येत नसल्याने अपघाताची शक्‍यता निर्माण झाली होती. सध्या ऊसतोडीचा हंगाम सुरु झाल्यामुळे या रस्त्यावरही वाहतुकीचा ताण आला आहे. त्यातच या कठड्यामुळे अपघाताची शक्‍यता निर्माण झाली होती. कठड्यामुळे अपघात होऊ नयेत यासाठी लोणंद येथील साथ प्रतिष्ठानने या कठड्याचा वाहनधारकांना अंदाज यावा, यासाठी रिफ्लेक्‍टर लावण्यात आले होते. तद्‌नंतर या धोकादायक कठड्यासंदर्भात दैनिक प्रभातनेही सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. प्रभातमध्ये या कठड्यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध होताच बांधकाम विभागाने वाहतुकीस अडथळा ठरणारा हा कठडा हटवला आहे. त्यामुळे दैनिक प्रभातचे वाहनधारकांमधून आभार मानले जात आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)