टोरांटो मास्टर्स टेनिस स्पर्धा: नदालचा खाचानोव्हवर सनसनाटी विजय 

टोरांटो: स्पेनच्या राफेल नदालने उपान्त्य सामन्यात केरन खाचानोव्हाचा दोन सेट मध्ये सहज पराभव करत टोरांटो मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या अंतीम फेरीत धडक मारली असून अंतीम फेरीत त्याचा सामना स्टेफनोस सित्सिपास सोबत होणार असून बिगरमानांकीत स्टेफनोसने उपान्त्य सामन्यात चौथे मानांकन असलेल्या केव्हिन अँडरसनचा खळबळजनक पराभव करत प्रथमच टोरंटो मास्टर्सची अंतीम फेरी गाठली आहे.
उपान्त्य फेरीतील सामन्यात अग्रमानांकीत राफेल नदालने केरन खाचानोव्हचा 7-6 (7-3), 6-4 असा पराभव करत अंतीम फेरीत धडक मारली. सामन्याच्या सुरूवाती पासूनच नदालने खाचानोव्ह समोर आक्रमक धोरण अवलंबले होते. त्यामुळे खाचानोव्ह सुरूवातीलाच ददपणात आला होता. मात्र त्याला आपली सर्व्हीस राखण्यात यश मिळत असल्याने त्याने नदालवर प्रतिआक्रमण करण्याचे धोरन अवलंबले त्यामुळे सामना रोमांचकारी झाला.
पहिल्या सेट मध्येच खाचानोव्हाने एक डबल फॉल्ट नोंदवल्याने त्याच्यावरिल दडपण सहज दिसून येत होते, याचा फायदा उचलत नदालने सामन्याचा पहिला सेट 7-6 (6-3) असा जिंकताना खाचानोव्हावरिल दडपण आणखीन वाढवले.
तर दुसऱ्या सेट मध्ये पहिल्यापासूनच नदालने खाचानोव्हावर हल्ला चढवला त्यामुळे त्याला आपली सर्व्हीस राखण्यात अपयश आले त्यामुळे दडपणात येत त्याने दोन डबल फॉल्ट केले. याचा पुरेपूर फायदा उचलत नदालने खाचानोव्हाला प्रती आक्रमणाची संधीच मिळू दिली नाही त्यामुळे नदालने दुसरा सेट 6-4 असा जिंकत टोरांटो मास्टर्सच्या अंतीम फेरीत धडक मारली.
तर, उपान्त्यफेरीतील दुसऱ्या सामन्यात ग्रीसचा युवा खेळाडू बिगरमानांकीत स्टेफॅनोस सित्सिपासने दक्षिण अफ्रिकेच्या चौथ्या मानांकीत केव्हिन अँडरसनचा 7-6 (7-4), 4-6, 6-7 (7-9) असा संघर्षपूर्ण पराभव करत स्पर्धेत आणखिन एक सनसनाटी निकालाची नोंद केली. सामन्यापुर्वी केव्हीन अँडरसन हा सामना जिंकेल असा कयास लावला जात होता. मात्र, स्टेफॅनोस सित्सिपासचा स्पर्धेतील आता पर्यंतचा प्रवास पहाता केव्हिनला हा सामना सोपा नसणार हे उघड होते.
त्याप्रमाणेच उपान्त्य सामन्यात दोघांनीही तोडीच्या खेळाचे प्रदर्शन केले. सामन्याच्या सुरूवाती पासूनच दोघांनीही एकमेकांवर दडपण आणन्याचे बरेचशे प्रयत्न केले. त्यामुळे खेळात दोघेही एकमेकांवर प्रत्येक गेम मध्ये आव्हान निर्माण करत होते. यातच सामन्याचा पहिला सेट 7-6 (7-4), असा जिंकत केव्हिनने स्टेफॅनोसवर दडपण आणन्याचा प्रयत्न केला. मात्र दुसऱ्या सेटमध्ये स्टेफॅनोसने पुनरागमन करताना दुसरा सेट 6-4 असा आपल्यानावे करत जबरदस्त पुनरागमन केले.
दुसरा सेट गमावल्याने काहिश्‍या दडपणात गेलेल्या केव्हिनने तिसऱ्या सेट मध्ये पुनरागमन करण्याचा बराचसा प्रयत्न केला मात्र त्यात त्याला अपयश आल्याने त्याने तिसरा सेट 7-6 (7-9) असा संघर्षपूर्ण गमावला. या पराभवाने केव्हीनचे आव्हान संपुष्टात आले असून स्टेफॅनोसने प्रथमच टोरांटो मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या अंतीम फेरीत प्रवेश केला आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)