टोमॅटो हमीभावासाठी सोमवारी बाजार समिती कार्यालसमोर निर्दर्शने

 हमाल, कामगार, शेतकरी उतरणार रस्त्यावर

पुणे- मागील काही दिवसांपासून टोमॅटोचे भाव घसरले आहेत. टोमॅटोस सध्या घाऊक बाजारात प्रती किलोस 4 ते 5 रुपये भाव मिळत आहे. उत्पादन खर्चही निघेनासा झाल्याने शेतकरी हैराण आहे. या पार्श्‍वभूमीवर टोमॅटोला स्वामिनाथ आयोगानु सुचविलेल्या तुरतुदीप्रमाणे उत्पादन खर्चावर 50 टक्के अधिक हमीभाव द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी पत्रकार परिषदेत केली.ड त्यावेळी कामगार युनियनचे अध्यक्ष अमोल चव्हाण आणि सचिव संतोष नांगरे, फलटण तालुक्‍यातील टोमॅटो उत्पादक शेतकरी जितेंद्र जाधव, जयराम थोरात उपस्थित होते. या प्रश्‍नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी येत्या सोमवारी (दि. 23 एप्रिल) मार्केट यार्डातील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत. या आंदोलनात शेतकऱ्यांसह हमाल, मापाडी, कामगार मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
डॉ. आढाव म्हणाले, शेतीमालास भाव मिळत नाही. परिणामी कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. हे थांबवण्यासाठी शेतीमालाला हमीभाव देणे आवश्‍यक आहे. टोमॅटो, कोथिंबिर आणि कांद्याच्या बाबतीत ही परिस्थिती नेहमी उध्दभवते. किमान या तीन शेतीमालांना हमीभाव देणे अपेक्षित आहे. सुरूवात टोमॅटो पासून करावी, अशी आमची मागणी आहे. या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांना पाठविण्यात आले आहे. या तीन्ही शेतमालाच्या हमीभावासाठी राज्यातील 300 हून अधिक बाजार समित्यांनी हमीफंड उभारावा. यास राज्य सरकारने मदत करावी. जेणेकरून हा प्रश्‍न कायमस्वरूपी सुटेल.
नांगरे म्हणाले, टोमॅटोपासून सॉस बनविला जातो. सॉसची किमान 100 रुपये किलो भावाने विक्री होते. हा बनविण्यासाठी फक्त 20 रुपये खर्च येतो. हा बनविणाऱ्यांना इतका नफा मिळतो. मात्र, शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही मिळत नाही. यात हस्तक्षेप करून सरकारने टोमॅटोला त्वरित हमीभाव द्यावा.
शेतकरी जयराम थोरात यांनी सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्याऐवजी हमीभाव देण्याची मागणी यावेळी केली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)