टोमॅटो शेती करायची कशी?

बदलणारे बाजारभाव आणि पिकांवरील रोगामुळे शेतकरी चिंतातुर

केडगाव- सतत बदलणारे बाजारभाव आणि पिकावर पडणाऱ्या रोगामुळे टोमॅटो शेती परवडत नसल्याची व्यथा केडगाव येथील शेतकऱ्यांनी मांडली आहे.
केडगाव येथे टोमॅटो पिकाची तोडणी सध्या चालू आहे. यावेळी काही शेतकऱ्यांशी संपर्क साधला असता येथील शेतकऱ्यांनी आपले मत व्यक्त केले. केडगाव गावठाण येथील सुमारे 15 पांड (30 गुंठे) शेतीत एका शेतकऱ्याने टोमॅटो पीक घेतले आहे. अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, आतापर्यंत प्लॉट तयार करण्यासाठी 50 हजार रुपये खर्च आला आहे. वाहतूक, औषध फवारणी आणि मजूर यांचा खर्च वजा जाता हातात काहीच राहत नाही. त्यातच औषध फवारणी केल्यानंतरसुद्धा टोमॅटो पिकावरील रोगाचा पूर्णपणे नायनाट होत नाही, त्यामुळे टोमॅटो बाजारात पाठवण्यापूर्वी मालाची प्रतवारी करावी लागत आहे आणि यात निम्म्या मालाची नासधूस होत आहे. सध्या टोमॅटो पिकाच्या एका क्रेटला 200 रुपये बाजारभाव मिळतो आहे. या पिकाच्या तोडणीसाठी मजुरांमध्ये पुरुषांना 400 रुपये, तर महिलांना 200 रुपये रोज द्यावे लागत आहेत. आठवड्यात तीनवेळा तोडणी करावी लागते. खराब माल एक तर फेकून द्यावा लागतो किंवा जनावरांसाठी वापरला जात आहे. सध्याचा बाजारभाव पाहता टोमॅटो पीक काढणे परवडत नसल्याचे येथील शेतकऱ्यांनी सांगितले; टोमॅटो पिकाला सरकारने हमीभाव दिला तर शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील, असे येथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)