टोमॅटो मातीमोल

  • भावच नसल्याने रस्त्याच्याकडेला दिला फेकून

करंजे, दि. 30 (वार्ताहर) – टोमॅटोला योग्य भाव मिळत नसल्याने सोमेश्‍वरनगर (ता. बारामती) परिसरतील शेतकऱ्यांना आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. विक्रीस आणलेल्या मालातून उत्पादन व वाहतूक खर्चदेखील निघत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी रस्त्याच्याकडेला माल फेकून देत आपला रोष व्यक्त केला. पतसंस्था व बॅंकामधून कर्ज घेऊन मोठ्या संख्येने विक्रीसाठी आलेल्या टोमॅटोला अत्यंत कवडीमोल बाजारभाव मिळत असल्याने उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.
सोमेशवर परिसर ऊस शेतीसाठी प्रसिद्ध असला तरी निंबुत, वाघळवाडी, वाणेवडी, करंजे, होळ, सस्तेवाडी, मुरूम, माळशी येथील अनेक शेतकऱ्यांनी बागायती पीके घेण्याकडे कल वाढला आहे. तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी विविध ठिकाणाहून कर्ज घेत महागडी बियाणे, औषधे, खते घेऊन टोमॅटोची लागवड केली. या महिन्यात मोठया प्रमाणात टोमॅटो विक्रीसाठी तयार झाले असल्याने, त्याची विक्रीसाठी तोडणी केली गेली; परंतु टोमॅटोला अल्प भाव मिळत असून ग्राहकच मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी नाईलाजास्तव हा माल जमिनीवर फेकून दिला, असे टोमॅटो शेतकरी सागर खोपडे, संतोष सूर्यवंशी, रमेश गायकवाड, हिंदुराव सकुंडे, दिगंबर मगर, दत्तात्रय कोलते यांनी सांगितले.
टोमॅटो लागवडीपासून ते विक्रीपर्यंत एका जाळीला शंभर रुपयांपेक्षा अधिक खर्च येतो. तर एकरी साधरण एक ते सव्वा लाखाचा खर्च येतो. त्या तुलनेत टोमॅटोच्या एका जाळीला अवघा दहा ते वीस रुपयांचा भाव मिळत असल्याने तालुक्‍यातील टोमॅटो उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून त्याने हे टोमॅटो विकण्यापेक्षा रस्त्याच्याकडेला फेकून दिले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)