पिंपरी – गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात मोशीतील नागेश्‍वर महाराज उपबाजारातील फळभाज्यांची एकूण आवक 992 क्विंटल झाली असून, पालेभाज्यांची आवक 22 हजार 840 गडड्या एवढी झाली आहे.

फळभाज्यांची आवक 324 क्विंटलने तर पालेभाज्यांची आवकदेखील पाच हजार 640 गडड्यांनी वाढली आहे.
बटाट्याची विक्रमी 276 क्विंटल आवक झाली असून, गेल्या आठवड्याच्या तुलनेत 222 क्विंटलची वाढ झाली आहे; मात्र भावात किरकोळ 100 रुपयांची घट झाली. कांद्याची आवक 33 क्विंटलने वाढून भाव मात्र 150 रुपयांनी वधारले. भेंडीची आवक 10 क्विंटलने वाढून भावात 650 रुपयांची वाढ झाली. गवारीची आवक दोन क्विंटलने वाढून, भावदेखील 500 रुपयांनी वधारले. तसेच टोमॅटोची आवक 201 क्विंटल आवक झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवक 71 क्विंटलने वाढून, भाव150 रुपयांनी घटले. मटारची आवक 12 क्विंटलने घटूनही भाव 2500 रुपयांनी वधारले. घेवड्याची आवक चार क्विंटलने घटून भाव250 रुपयांनी घटले.

दोडक्‍याची आवक सहा क्विंटलने घटून, भाव 250 रुपयांनी घसरले. लसणाची आवक एक क्विंटलने वाढून, राहून, भाव मात्र 500 रुपयांनी घटले. आल्याची आवक दोन क्विंटलने घटून, भाव 250 रुपयांनी घटले. मिरचीची आवक 12 क्विंटलने वाढून, राहून भाव मात्र 250 रुपयांनी घटले. दुधी भोपळ्याची आवक तीन क्विंटलने घटून, भाव मात्र स्थिर राहिले. कारल्याची आवक दोन क्विंटलने घटून, भावात 400 रुपयांची घट झाली. गाजराची आवक दोन किंटलने घटून, भाव मात्र 400 रुपयांनी घटले. फ्लॉवरची आवक 13 क्विंटलने वाढून भाव मात्र 350 रुपयांनी वाढले. कोबीची आवक आठ क्विंटलने वाढून भाव मात्र 350 रुपयांनी घटले. वांग्याची आवक 17 क्विंटलने घटली असून, भावात 500 रुपयांची घट झाली. लिंबाची आवक दोन क्विंटलने घटून, भावात 500 रुपयांची वाढ झाली. मका कणीसची सहा क्विंटल आवक वाढून, भाव मात्र 250 रुपयांनी घटले.

शेवग्याची आवक स्थिर राहून, भावात 750 रुपयांची वाढ झाली. ढोबळी मिरचीची आवक एक क्विंटलने वाढून, भाव 750 रुपयांनी घसरले. डांगरची आवक स्थिर चार क्विंटलने वाढून, भाव 100 रुपयांनी घटले. तोंडल्यांची आवक तीन क्विंटलने वाढून, भाव मात्र स्थिर राहिले. बीटची तीन क्विंटल आवक घटून, भावात 950 रुपयांची घट झाली. पावट्याची एक क्विंटल आवक वाढून, भाव 500 रुपयांनी घटले. याशिवाय चवळीची एक क्विंटल आवक वाढून, भाव मात्र स्थिर राहिले. घोसावळ्याची दोन क्विंटल आवक होऊन, भाव 2100 रुपयांवर स्थिरावला.भुईमुग शेंगांची स्थिर राहन . भाव 250 रुपयांनी वधारले.

पालेभाज्यांमध्ये कोथिंबीरीच्या सात हजार 580 गड्ड्यांची आवक झाली. तर मेथीची सात हजार 620 गड्ड्या आवक झाली आहे. याशिवाय शेपूची दोन हजार 115 गड्ड्या, मुळे 735 गड्ड्या, पुदीना एक हजार गडड्या, पालक दोन हजार 650 गड्ड्या, तर कांदापातीच्या एक हजार 240 व चुकाची 100 गडड्‌यांची आवक झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)