टोमॅटो झाला स्वस्त!

पिंपरी – यंदा बाजारात टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने बाजारात टोमॅटो 8 ते 10 रूपये किलोने विकला जात आहे. त्यामुळे एकीकडे ग्राहकाला दिलासा मिळाला असला तरी शेतकरी आणि व्यापाऱ्याला त्याचा फटका बसला असल्याचे चित्र बाजारात बघायला मिळत आहे.

स्वयंपाक घरातील उपयोगी फळभाजी म्हणून टोमॅटोचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो. परंतु,ण मागील काही आठवड्यात 40 ते 50 रूपये किलो असलेला टोमॅटो आता 8 ते 10 रूपये किलो दराने मिळत असल्यामुळे ग्राहक खूष आहेत. तसेच हॉटेल आणि लग्नसराई असल्यामुळे लॉन्सकडून सुद्धा मागणी वाढल्याचे विक्रेते ज्ञानेश्वर उकीरडे यांनी सांगितले.

पिंपरी बाजारात चंदन नगर, मार्केट यार्ड, नारायणगाव आणि चाकण परिसरातून माल येतो. तर काही व्यापारी संगमनेर आणि नाशिकवरून सुद्धा टोमॅटो बाजारात घेऊन येत आहेत. त्यामुळे बाजारात सगळीकडेच टोमॅटोच बघायला मिळत आहे. परंतु, त्याला भाव नसल्यामुळे शेतकरी आणि व्यापारी सुद्धा हवालदील झाले आहेत.
शेतकऱ्यांना शेतातून काढून इथपर्यंत आणायला सुद्धा परवडत नसल्याचे एका शेतकऱ्याने सांगितले, तर त्याचा खर्च निघणे तर खूपच लांबच राहिले आहे, किलो 5 ते 6 रूपये प्रमाणे घ्यायला सुद्धा व्यापारी मागे पुढे पाहत असल्याचे या वेळी एका शेतकऱ्याने सांगितले, शेतात एवढे राबूनही आणि उत्पन्न चांगले येऊनही त्याला काहीच भाव नाही. त्यामुळे टोमॅटोने रडकुंडीला आणल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

उष्णतेमुळे साठवणुकीवर परिणाम
बाजारात टोमॅटोची आवक वाढल्याने कोणत्या भावाने विक्री करावी ते समजत नसल्याची खंत एका व्यापाऱ्याने या वेळेस बोलून दाखविली. पाच ते सहा रूपयाने जाग्यावरून घेतल्यावर 10 ते 12 रुपये तरी मिळायला पाहिजे. पण तेवढे ही रूपये निघत नाही आहेत. उष्णतेमुळे टोमॅटो लवकर खराब होतात. त्यामुळे ते एक-दोन दिवस साठवूनही ठेवता येत नाहीत. दर कमी करुन टोमॅटो विकण्याची वेळ व्यापाऱ्यावर आली आहे, असे ही एका व्यापाऱ्याने या वेळी सांगितले. प्रत्येक दिवशी बाजारात टोमॅटोची आवक वाढतच चालली असली तरी त्याचे भाव मात्र दिवसेंदिवस कमी होत आहेत. त्यात व्यापारी परस्पर आजूबाजूच्या गावशिवारातून टोमॅटो विक्री करत आहे. त्यामुळे आवक वाढली असून त्याचा परिणाम बाजार भावावर पडत असल्याची चर्चा आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)