टोमॅटोला भाव नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त

उरुळी कांचन- हवेली तालुक्‍यात सध्या मोठ्या प्रमाणात कांदा, टोमॅटोचे उत्पादन घेतले जात आहे. मात्र, यावर्षी टोमॅटो पिकांला बाजार नसल्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात सापडला असल्याची माहिती खामगाव येथील विठ्ठल थोरात यांनी दिली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, खामगावटेक येथील शेतकऱ्यांनी सुमारे दोन एकरात टोमॅटोची लागवड करण्यासाठी शेणखत, मशागत, रासायनिक खते, मजुरी, औषधे, असा सुमारे चार लाखापर्यंत खर्च केला आहे. टोमॅटोचग पीकही मोठ्या प्रमाणात निघत आहे. मात्र, टोमॅटोला 4 रुपये किलोपासून ते 2 रुपये किलोपर्यंत बाजारभाव मिळत असल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. भाव नसल्याने आलेल्या मालाची तोडणी बंद करून झालेला खर्च तरी कसा भरून निघणार या चिंतेत सध्या शेतकरी आहे. या बाबत विजय टिळेकर यांच्याशी चचार केली असता ते म्हणाले की, सध्या मार्च महिना सुरू असल्याने विविध बॅंका, पतसंस्थांचे आणि त्याचबरोबर एलआयसीचा हप्ताही भरावयाचा आहे. मात्र, टोमॅटोच्या पिकाला बाजारभावच नसल्याने शेतकरी आथिक अडचणीत सापडला आहे. केलेला खर्चच सध्याच्या बाजारभावात भरून येत नसल्याने आता हे हप्ते कसे भरायचे, हीच चिंता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)