टोमॅटोचे भाव ८ वर्षांतील नीचांकी पातळीवर

नवी दिल्ली : ओरिसा, उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेशातील बाजारात एप्रिलमध्ये दशकभरातील सर्वाधिक प्रमाणात आवक झाल्याने आणि प्रमाणापेक्षा अधिक भाव पडल्याने टोमॅटो स्वस्त म्हणजे चाऱ्यापेक्षाही अधिक कमी भावाने विकले जात आहेत.

टोमॅटोला २ रु./किलोचा भाव मिळत असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. यातून त्यांची उत्पादनाची किंमतदेखील निघत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

साधारणपणे एप्रिलदरम्यान टोमॅटोचे भाव उच्च पातळीवर असतात. कारण, वाढत्या तापमानामुळे त्याचा पुरवठा कमी होतो. असे असले, तरी मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिल-२०१८ मध्ये टोमॅटोचे भाव मागील आठ वर्षांतील सर्वांत कमी राहिले आहेत. शासनाने याबाबत काहीतरी ठोस भूमिका घ्यावी आणि शेतमालाला किमान हमीभाव द्यावा अशी मागणी या संतप्त शेतकऱ्यांनी केली आहे. मागील आठवड्यात याच राज्यातील काही शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकून आपला राग व्यक्त केला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)