टोकदार खडीने टायर पंक्चर

कराड-चिपळूण रस्त्याला बांधकाम विभागाकडून ग्रहण
कोयनानगर, दि. 12 (वार्ताहर) -कराड-चिपळूण रस्त्यावर उकडलेल्या रस्त्यावर खड्डे बुजविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने नामी शक्कल लढवून खड्डे बुजविण्यासाठी काळ्या दगडाची जाडी खडी टाकली आहे. या टोकदार खडीमुळे अनेक वाहनांचे टायर पंक्चर होत असल्याने या मुख्य रस्त्याला बांधकाम विभागाकडूनच ग्रहण लागले असल्याचे चित्र दिसून येत आहे. बांधकामाच्या अशा बेजबाबदार कामामुळे वाहनधारकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
कराड-चिपळूण रस्त्यावर पाटण ते कोयना या मुख्य रहदारीच्या मार्गावर काळोली, येराड, मारुल, वाजेगाव, कराटे, गोजेगाव आणि संगमनगर (धक्का) या ठिकाणी रस्ता उकडलेला आहे. या उकडलेल्या रस्त्याच्या खड्ड्यांची दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत सुरू आहे. पावसाळ्यात या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची नामी शक्कल अभियंत्यांनी लढविली आहे खरी, पण यामुळे अनेक वाहन चालकांना मात्र अधिकार्‍यांच्या या नामी शक्कलचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. खड्डे बुजविण्यासाठी मुरूम, जांभा दगड, गोटे वापरले जात असत. त्यावर रोलर फिरवून ते खड्डे बुजले जात आहेत. पण आठवडाभरातच हे दगडाचे गोठे निघाले आहेत. मात्र बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी लावलेल्या नवीन जावई शोधामुळे तासभारापूर्वी खड्डयात टाकलेली खाडी निघायला सुरुवात झाली आहे. या खड्ड्यात असणारी टोकदार दगडे वाहनांच्या टायर मध्ये घुसून अनेक वाहनांचे टायर पंक्चर होऊ लागले आहेत.
दोन तासापूर्वी पसरलेली जाड खडी अवजड वाहनांच्या चाकाने विस्कटली जातेय, आणि पुन्हा तेच खड्डे आणि खड्यात पाणी ही अवस्था पहावयास मिळत आहे. यापूर्वी या भागात मिळणारे जांभा दगडाचा चुरा किंवा खडी टाकून रस्त्याचे खड्डे भरले जात होते, मात्र या वर्षी काळ्या दगडाची जाड खडी टाकली जात आहे. त्यामुळे वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे.
सध्या कराड- चिपळूण रस्त्याच्या रुंदीकरणासाठी बाजूची मोठमोठी झाडे तोडून रुंदीकरणाचे काम सुरू होण्याच्या मार्गात आहे. अशा वेळी तात्पुरती मलमपट्टी करण्यासाठी बांधकाम विभागाकडून नामी शक्कल लढविली जात आहे खरी पण ही शक्कल कितपत फायदेशीर ठरेल, हे येणारी वेळच ठरवेल. मात्र बांधकाम विभागाच्या या जावईशोधाची सर्वत्र चर्चा सुरु आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)