‘टॉयलेट एक प्रेम कथा’ला पहिल्या दिवशी दमदार ओपनिंग

मुंबई : अभिनेता अक्षय कुमारचा सामाजिक विषयावरील चित्रपट ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ला पहिल्या दिवशी दमदार ओपनिंग मिळाली आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 13.10 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
शनिवार, रविवार आणि मंगळवारी स्वातंत्र्यादिनाच्या सुट्टीमुळे हा चित्रपट आणखी कमाई करणार आहे. पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा अक्षय कुमारचा हा या वर्षातील दुसरा चित्रपट ठरला. यापूर्वी अक्षय कुमारच्या जॉली एलएलबी 2 ने पहिल्या दिवशी 13.20 कोटी रुपयांची कमाई केली होती. मात्र टॉयलेट एक प्रेम कथा या चित्रपटाने हा आकडा गाठला नाही. या चित्रपटाला समीक्षकांकडूनही दाद देण्यात आली आहे. टॉयलेट एक प्रेम कथा हा सामाजिक विषयावरील चित्रपट आहे. अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर यांची या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)