टॉम क्रूझ करणार ‘मिशन इंपॉसिबल’ 7 आणि 8

मिशन इंपॉसिबल’ची अख्खी सिरीज हॉलीवूडमध्ये प्रचंड गाजली, हिट झाली आणि त्याचे अन्य भाषांमध्ये डबिंगही झाले. टॉम क्रूझची अॅक्‍शन, स्टंट आणि श्‍वास रोखून धरायला लावणारे चेसिंग सिक्‍वेन्स यामुळे “एम आय’ ला प्रेक्षकांनी उचलून धरले होते. “मिशन इंपॉसिबल’मध्ये टॉम क्रूझने स्वतःच सगळे स्टंट केले होते. त्यामुळेही त्याच्या या महत्वाकांक्षी सिरीजला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. विशेषतः “एमआय-2’च्या अखेरीस असलेला मोटरसायकल पाठलागाचा थरार आणि सिक्रेट चीप चोरण्यासाठी स्वतःला उलटे टांगून केलेली कसरत प्रेक्षक कधीच विसरू शकत नाहीत.

“मिशन इंपॉसिबल फॉलआऊट’मध्येही हीच थरारक अनुभूती होती. याच थरारक स्टंट आणि अॅक्‍शनच्या जोरावर आता टॉम क्रूझने “मिशन इंपॉसिबल’ सिरीजमधील 7 आणि 8 व्या भागाची तयारी सुरु केली आहे. स्वतः टॉमने आपल्या ट्‌विटर हॅन्डलवरून ही माहिती दिली आहे. “एमआय- फॉलआऊट’चे डायरेक्‍शन करणाऱ्या ख्रिस्तोफर मॅक्‍वेरी याच्याकडेच या दोन्ही सिनेमांच्या दिग्दर्शनाची जबाबदारी असणार आहे. ख्रिस्तोफरने देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या दोन्ही सिनेमांचे शूटिंग एकाचवेळी होणार आहे. 2021 आणि 2022 च्या उन्हाळ्याच्या सुटीमध्ये एकापाठोपाठ एक करत दोन्ही सिनेमे रिलीज होणार आहेत. एकाचवेळी शूटिंग करण्याचे कारण म्हणजे टॉम क्रूझचे वय हेच आहे. सध्या हा पठ्ठ्या 59 वर्षांचा आहे. अॅक्‍शन सीन करण्यासाठी हे वय खूप झाले. त्यानंतर कदाचित तो ही फ्रॅंचायजी सोडून देखील देऊ शकतो. सर्वसाधारणपणे हे सिनेमे होणार असे जाहीर झाल्यापासून सिनेमा बनण्यासाठी 3 वर्षांचा काळ लागतो. त्यामुळे दोन्ही सिनेमे एकदमच करणे फायद्याचे ठरणार आहे.

“मिशन इंपॉसिबल’ फ्रॅंचायजीला 1996 साली सुरुवात झाली होती. आतापर्यंत गेल्या 20 वर्षात या फ्रॅंचायजीमधून “एमआय’सिरीजच्या 6 सिनेमांची निर्मिती झाली आहे. एथन हॉंट या सिक्रेट एजंटची स्टंटबाजी प्रेक्षकांना बघायची उत्कंठा आतापासूनच लागलेली असणार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)