टेस्ट टयुब बेबी उपचाराचा 65 टक्के रुग्णांचा फायदाच..

टेस्ट टयुब बेबी उपचाराचा 65 टक्के रुग्णांचा फायदाच..
पुणे- जीवनशैली बदलल्यामुळे महिलांमध्ये वंध्यत्वाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे रुग्णांना उपचारादरम्यान सतत पाठिंबा देण्याची गरज असते. याबाबत देशात अनेक उपचारपध्दती कार्यरत असून त्या खूप महागडया आहेत. असे असूनही त्याचा फायदा रुग्णांना होईलच हे सांगता येणार नाही. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांचा विचार करता अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त टेस्ट टयुब बेबी सेंटर विकसित करण्यात आले आहे. या सेंटरच्या माध्यमातून उपचार घेणाऱ्या रुग्णांना आता 65 टक्के फायदा होणार आहे, अशी माहिती आयव्हीएफ व टेस्ट टयुब बेबी तंत्रज्ञानातील डॉ. यशवंत माने यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

विकसिनशिल देशातील चार जोडप्यामागे एकाला वंध्यंत्वाची समस्या असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आजची समस्या ज्वलंत झाली आहे. यावर मात करण्यासाठी अथवा सर्वसामान्यांना परवडणाऱ्या किंमतीत प्रभावी उपचार देणे काळाची गरज आहे. या आधारावर संशोधन करुन अत्याधुनिकयुक्त अशी टेस्ट टयुब बेबी सेंटर कार्यान्वित करण्यात आली आहे. यासंदर्भात अधिक माहिती देताना डॉ. माने म्हणाले, देशात जवळपास 700 आयव्हीएफ सेंटर कार्यरत आहेत. येथे 30 ते 45 टक्के यशस्वी उपचार केले जातात. परंतू, आता या नवीन उपचार पध्दतीमुळे रुग्णांना 65 टक्के उपचाराचा फायदा होणार आहे.
डॉ. माने म्हणाले, वंध्यत्व ही अतिसंवेदनशील बाब असल्याने अनेक वेळा गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण होत असते. 20 ते 30 टक्के वंध्यत्वाच्या प्रकरणांमध्ये 50 टक्के पुरुष व महिला सारखेच जबाबदार असल्याचे एका संशोधनानुसार स्पष्ट झाले आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे मागील दशकाच्या तुलनेत महिलांसह पुरुषांच्या वंध्यत्वात सुध्दा वाढ झाली आहे. त्यामुळे अचूक निदानासाठी सुसज्ज ऍड्रॉलॉजी लॅब उपलब्ध करण्यात आले आहे.

24 तास तज्ज्ञ डॉक्‍टर्स उपलब्ध..
औंध येथील श्री साई हॉस्पिटलमध्ये ही अत्याधुनिक टेस्ट टयुब बेबी सेंटर कार्यान्वित करण्यात आले आहे. हे सेंटर येत्या 25 जूनला सुरु होणार असून येथे तज्ज्ञ डॉक्‍टरांची टीम उपलब्ध असणार आहे. तर, ही टीम 24 तास रुग्णांना सेवा देणार आहे. या टीममध्ये डॉ. भाऊसाहेब पाचुन्डकर (अँड्रालॉजीस्ट), वंध्यत्व विशेषतज्ञ डॉ. शैलेजा पाचुन्डकर आणि डॉ. गिरीष पोटे महत्वाची भूमिका बजावणार आहेत. या सेंटरमध्ये सीओटू एनक्‍युबेटॉर, आयसीएसआय मशीनसह तपासणी यंत्रणा सज्ज असणार आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)