टेलीफोन सल्लागार समितीवर मांडोत

पिंपरी – भारताचे संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या शिफारशीवरून अखिल भारतीय मारवाडी युवा मंचाचे प्रांतीय संयुक्त मंत्री उद्योगपती उमेश मांडोत यांची नियुक्ती पुणे जिल्हा टेलीफोन सल्लागार समितीच्या सदस्यपदी झाली आहे.

उमेश जैन मांडोत म्हणाले की, संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी जो विश्‍वास माझ्यावर ठेवून मला हे पद दिले आहे त्या विश्‍वासास पात्र राहिल. खासदार अनिल शिरोळे, पालकमंत्री गिरिष बापट, सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्ह्यातील सर्व बीएसएनएल टेलीफोन व मोबाइल धारकांच्या समस्या सोडविण्याचा पुरेपुर प्रयत्न करणार आहे. बीएसएनएल संबंधीत सूचना व तक्रारींबाबत 9822099281 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)