टेरर फंडिंग प्रकरणात बांगला देशाची पाकिस्तान विरोधात जोरदार मोहीम 

ढाका (बांगला देश) – टेरर फंडिंग प्रकरणात बांगला देशाने पाकिस्तान विरोधात जोरदार मोहीम सुरू केली आहे. दि. 23 डिसेंबर रोजी होणाऱ्या संसदीय निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर बांगला देशाने ही कारवाई सुरू केलेली आहे. आयएसआय (इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स) ही पाकिस्तानी गुप्तचर संस्था बांगला देशात सक्रिय असणाऱ्या दहशतवादी संघटनांना आणि एनजीओजना फंडिंग करत असते. या फंडिंगच्या विरोधात शेख हसीना सरकारने मोहीम सुरू केली आहे.

एका दहशतवादी संघटनेशी संबंधित स्मॉल काइंडनेस बांगलादेश या एनजीओच्या आठ कर्मचाऱ्यांना ढाका पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. बंदी घालण्यात आलेल्या अन्सार अल इस्लाम या दहशतवादी संघटनेशी त्यांचा संबंध होता. त्याचबरोबर एका विमा कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विरोधातही कारवाई सुरू केली आहे. या सर्वांना पाकिस्तानमधून फंडिंग होत होते. दहशतवाद्यांचे अनेक अड्डेही शोधून काढण्याचे काम करण्यात आले आहे. यात मेजर सैयद झिया ऊल हक नावाच्या एका फरारी लष्करी आधिकाऱ्यावरही कारवाई सुरू करण्यात आली आहे.

-Ads-

हा मेजर दहशतवादी नेता बनला आहे. सन 2016 च्या कॅफे हल्ल्यानंतर दहशतवाद्यांवरील कारवायामध्ये शंभरावर दहशतवाद्यांना गोळ्या घालण्यात आल्या असून 1500 पेक्षाही अधिक जणांना अटक करण्यात आल्याची माहिती देण्यात आलेली आहे. शेख हसीना सरकारने सुरू केलेल्या कारवाईचा फायदा भारतालाही होणार आहे. एक शेजारी राष्ट्र या नात्याने दहशतवादाविरुद्धची ही कारवाई स्थिरतेच्या दृष्टीने भारतालाही महत्त्वपूर्ण आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)