टेम्पो चोरणाऱ्या दोघांना अटक

पिंपरी – टेम्पो चोरणाऱ्या दोन आरोपींना चिखली पोलिसांनी अटक केली असून चोरीचा टेम्पो ताब्यात घेतला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. 26) दुपारी अडीचच्या सुमारास करण्यात आली.

आरमान इबनेहसन शाह (रा. कुदळवाडी, चिखली) व धर्मींदर राजकुमार पासवान (वय-22, जाधववाडी, चिखली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखली परिसरात पोलीस गस्त घालत असताना चोरीला गेलेला एम. एच. 14, ई एम 2405 हा टेम्पो मोरेवस्ती येथे मोशीच्या दिशेने जाताना दिसला. यावेळी पोलिसांनी त्यांचा पाठलाग करत आरोपींना ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडे गाडीची कोणतीच कागदपत्रे नव्हती व टेम्पोचा चासी नंबरही चोरीला गेलेल्या टेम्पोच्या चासी क्रमांकासारखाच होता. यावेळी पोलिसांनी खाक्‍या दाखवताच त्यांनी शुक्रवारी (दि. 19) शिवाजीनगर सेक्‍टर क्रमांक 16 प्राधिकरण येथून चोरल्याचे कबूल केले. या कारवाईत पोलिसांनी 75 हजार रुपयांचा तीन चाकी टेम्पो जप्त केला आहे.

पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, पोलीस निरीक्षक गुन्हे शंकर आवताडे, पोलीस उपनिरीक्षक भरत चापाईतकर, मधुसुदन घुगे, पोलीस हवालदार नरेंद्र राजे, पोलीस नाईक आनंदा नागरे, संदीप राठोड, शंकर यमगर, विनोद जाधव, किशोर धनवडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)