टेम्पो चालकास तीन महिने सक्‍तमजुरी

  • तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत : राजगुरूनगर न्यायालयाचे न्यायदंडाधिकारी तांबोळी यांनी सुनावली शिक्षा

राजगुरूनगर – चाकण-शिक्रापूर महामार्गावर 30 वर्षीय तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या टेम्पोचालकास तीन महिने सक्‍तमजुरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही शिक्षा राजगुरुनगर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी वाय. जे. तांबोळी यांनी ठोठावली आहे.
राजेश चंद्रकांत एकर (वय 30, रा. नांदगिरी ता कोरेगाव जि. सातारा) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. या खटल्याची माहिती अशी की, दि. 27 मे 2010 रोजी दुपारी सव्वाच्या सुमारास गोरक्ष बबन संकपाळ (वय 30 रा. मोराची चिंचोली, ता. शिरूर) हे त्यांची बहिण संगीता मोहन पुंडे यांना सासरी सोडण्यासाठी चाकण शिक्रापूर रस्त्याने दुचाकीवरून चालले होते. ते बहूल गावाच्या परिसरात दुचाकी (एमए 14 एटी 5546) वरून जात असताना शिक्रापूरकडून चाकणकडे भारधाव वेगात जाणारा टेम्पो (एमएच04 सीजी 2540) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील गोरक्ष संकपाळ यांचा जागीच मृत्यू झाला तर संगीता पुंडे या गंभीर जखमी झाल्या होत्या. अपघात झाला. त्यावेळी संगीता हिचा पती मोहन पुडे हे दुचाकीवरून त्यांच्या मागे जात होते. ते या अपघाताचा प्रथमदर्शी साक्षीदार होते. मेव्हण्याच्या मृत्यूस व पत्नीला गंभीर जखमी केल्याबद्दल चाकण पोलीस ठाण्यात मेव्हणे मोहन पुंडे यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार चाकण पोलिसांनी आरोपी राजेश चंद्रकांत एकर यांच्या विरोधात तपासी अंमलदार अशोक पिंगळे यांनी तपास करून मोटार वाहन कायदा कलमान्वये गुन्हा दाखल केला होता.
हा खटला राजगुरुनगर येथील प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी वाय. जे. तांबोळी यांच्या न्यायालयात सुरू होता. त्याचा निकाल आज त्यांनी दिला. सरकारी पक्षाच्यावतीने ऍड.रजनी नाईक यांनी चार साक्षीदार तपासत केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत तांबोळी यांनी राजेश चंद्रकांत एकर यास दोषी ठरवत शिक्षा ठोठावली.या खटल्याचे न्यायालयीन पोलीस कामकाज संजय मोघे यांनी पहिले.

  • अशी आहे शिक्षा
    आरोपी राजेश चंद्रकांत एकर यास भादवि कलम 279,304(अ), 337, 338 अन्वये 3 महिने सक्‍त मजुरी, मोटार अधिनियम कायदा कलम 184 अन्वयते तीन महिने सक्‍तमजुरी व दोन हजार रुपये दंड, तसेच मयताच्या नातेवाईकाला पाच हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)