टेम्पो चालकाला तीन महिने तुरूंगवास

टेम्पोने धडक देऊन महिलेच्या मृत्यूस कारणीभुत ठरल्याप्रकरणी  शिक्षा
पुणे, दि. 31 (प्रतिनिधी) -भरधाव वेगाने जात असलेल्या टेम्पोने पायी जात असलेल्या महिलेला धडक देऊन तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी टेम्पो चालकाला तीन महिने साधा कारावासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. तसेच फिर्यादीच्या नातेवाईकांना 20 हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याचा आदेश देण्यात आला आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी रोहिणी पाटील यांनी हा आदेश दिला आहे.
याप्रकरणी मेहबूब महम्मद बेनूर या टेम्पोचालकाला शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही घटना 27 एप्रिल 2004 रोजी मुंबई -बेंगलोर महामार्गावर हॉटेल हरिओम समोर वारजे येथे घडली. कविता शंकर अदमाने या महिलेचा या घटनेत मृत्यू झाला. कविता या पायी जात होत्या. त्यावेळी भरधाव वेगाने आलेल्या टेम्पोने त्यांना जोरात धडक दिली. या अपघातात कविता यांचा मृत्यू झाला. या खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील नीलेश लडकत यांनी पाहिले. या खटल्यामध्ये मयत महिलेच्या जावेची राधा अदमाने यांची साक्ष महत्त्वाची ठरली. न्यायालयाने टेम्पो चालक बेनूर याला शिक्षा सुनावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)